अहमदनगर: अहमदनगरच्या पाथर्डीतल्या कोरडगावात मिलिटरी कँन्टीनच्या दारुचा ट्रक उलटला. हा ट्रक नागपूरहून पुण्याला जात होता. रस्ता अरुंद असल्यानं ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं  ट्रक उलटला. ट्रकमध्ये पाचशे विदेशी दारुचे बॉक्स होते. साधारण चाळीस लाख रुपये किंमतीची दारु असल्याची चर्चा आहे. ट्रक उलटल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गावकऱ्यांनी दारुचे काही बॉक्स लांबवल्याचं कळतं आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं. VIDEO: