नवाब मलिकांनी जाहीर लेखी माफी मागावी आणि तसा खुलासा करावा, अन्यथा नवाब मलिकांविरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करावे लागतील अशा स्वरुपाची नोटीस नवाब मलिकांना पाठवण्यात आली आहे. अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. दरम्यान मलिकांनी केलेल्या या आरोपांबद्दल खुद्द अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
दरम्यान, आज अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. अद्याप सरकारकडून कुणीही अण्णांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी अण्णांनी उपोषण सुरु केलं आहे.
केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी
राज्यात लोकयुक्ताचा निर्णय झाला असला तरी केंद्रात लोकपालचा निर्णय घेण्याची मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकायुक्ताबाबत सरकारनं अधिवेशनाची वाट न पाहता अध्यादेश काढावा, लोकपाल नेमावा तसंच शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा यांसारख्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.