त्यासाठी तब्बल दोन ट्रक जुने कपडे वापरण्यात आले. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भगदाड बुजवण्यासाठी परिसरातून जुने कपडे गोळा केले जात आहेत.
खरं तर यापूर्वीही वेण्णालेक धरणातून पाण्याची गळती सुरु होती. मात्र तेव्हा तात्पुरती डागडुजी करण्यात आली. आता पुन्हा एकदा धरणातून गळती सुरु झाली आहे.
धरणाला मोठी गळती
पर्यटकांचं आकर्षण असलेलं आणि महाबळेश्वर, पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणी पुरवठा करणारं वेण्णा लेकला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाल्याची बातमी, एबीपी माझाने 5 ऑक्टोबरला दिली होती. मात्र त्यावेळी संबंधित प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला. नाही म्हणायला महाबळेश्वर गिरिस्थानच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी वेण्णा लेकला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे. तर चार वर्षापूर्वी आमदार फंडातून तीन कोटी रुपये खर्चून या लेकची किरकोळ गळती बंद करण्यात आली होती.
वेण्णा लेक हे सध्या महाबळेश्वर गिरीस्थान यांच्या ताब्यात आहे.
संबंधित बातमी
महाबळेश्वरमधील वेण्णा लेकला गळती, परिसरात भीती