Laxman Hake On Manoj Jarange : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचा दावा करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मनोज जरांगे तू कोर्टात येच, एकदा 'दूध का दूध पानी का पानी' होईल असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 


दरम्यान याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे यांनी ओबीसी समाजाला दिलेलं चॅलेंज आज काही वृत्तवाहिनीवर पाहण्यात आले. मनोज जरांगे म्हणतात की, आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध केला, तर आम्ही ओबीसीचा आरक्षण न्यायालयात चॅलेंज करून तुमचं आरक्षण रद्द करणार. त्यामुळे मनोज जरांगे तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही. ओबीसी भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि ज्याचे हक्क, अधिकार डावलली गेली त्या माणसाला आमच्या समाजाने जे प्रावधान करून ठेवलं आहे. आरक्षणाच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून जी प्रतिनिधित्वाची भाषा बोलली ती तुला संपवायची आहे. म्हणजेच आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसींच्या आरक्षणाला विरोध असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली.


खोटारडेपणा करून घुसखोरी केली...


पुढे बोलतांना लक्ष्मण हाके म्हणाले की,"एका बाजूला ओबीसीमधून आरक्षण मागायचं, दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करतो असं म्हणायचं. हे दोन्ही विरोधीभास वक्तव्य नाहीत का?, तुझ्याकडून ती औकातच नाही. त्यामुळे तू कोर्टात येच, तसेही खोटारडेपणा करून तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करून घुसखोरी करत आहात. तुम्ही खोटारडेपणा केला आहेच,” असेही हाके म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे उल्लंघन केलं 


याचवेळी हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. "मुख्यमंत्री यांनी संविधानिक पदावर राहून सुद्धा, आणि या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचे दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा त्यांनी कायद्याचे उल्लंघन केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचं उल्लंघन केलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मनोज जरांगे आपण कोर्टात आवश्यक भेटू, आम्ही संविधानाची भाषा बोलतो. सामाजिक न्यायाची भाषा आम्ही बोलतो. आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकाची भाषा आम्ही बोलतोय. कोर्टात आपण जरूर भेटू, एकदा दूध का दूध पानी का पानी होईल. जरांगे तुमचं स्वागत आहे तुम्ही या...असे हाके म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


...तर OBC आरक्षणच रद्द होऊ शकते, मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये खळबळ