Laxman Hake : आमदार खासदारांना मराठा समाजाची भीती वाटते, पण 50 टक्के OBC समाजाची भीती वाटत नाही असे वक्तव्य लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं. आम्ही जनतेचा हिस्सा नाही का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) स्वत:ला OBC नेता म्हणऊन घेतात. पण OBC चे आरक्षण जात असताना ते बोलत नाही. त्यांना लोक दारात उभे का करणार असा सवालही हाके यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ द्यावी 


मी काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. आम्हाला ज्यांची मदत लागेल त्यांची मदत घेऊ असे लक्ष्मण हाके म्हणाले. राहुल गांधी obc साठी सकारात्मक असताना राज्यातील नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण obc वर बोलत नाहीत. त्यामुळं राहुल गांधी यांची वेळ द्यावी अशी विनंती वडेट्टीवार यांना केल्याची माहिती हाके यांनी दिली आहे. 


जातीनिहाय 100 लोकांची यादी तयार, मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना पाडणार


आज मी पुण्यात खाजगी वाहिन्यांना मुलाखती देणार असल्याचे हाके म्हणाले. उद्या मी मुंबईमध्ये जाणार आहे. आम्ही काही लोकांची यादी बनवली आहे. त्या मतदारसंघात काम करणार असल्याचे हाके म्हणाले. काही IT कंपन्यांसोबत बोललो देखील आहोत. 100 मतदार संघातील लोकांची मतं जाणून घेतली आहेत. आम्ही प्रॅक्टिकली त्यावर फक्त बोलत नसल्याचे हाके म्हणाले. जातीनिहाय 100 लोकांची यादी तयार आहे. त्यात सर्वपक्षीय लोक, ज्यांनी मनोज जरांगेंना रसद पुरवली, पाठींबा दिला त्यांना पाडणार असल्याचे हाके म्हणाले. दरम्यान, लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता संविधानाची भाषा करतो. ओबीसींची चळवळ कुठेही थांबवणारा हा कार्यकर्ता नाही. त्यामुळं मी लढाई कायम लढत राहणार असल्याचे हाके यांनी सांगितलं. 


नितीन गडकरींना सामाजिक न्याय मंत्री करावं


संभाजीराजे यांच्या कार्यकर्त्यांवर वेळीच कारवाई झाली असती तर माझ्यावर पुण्यातील हल्ला झाला नसता असेही हाके म्हणाले. दरम्यान, रामदास आठवले कपेबल आहेत, पण नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जर सामाजिक न्याय मंत्री करुन लाख दीड लाख कोटींचा बजेट करावं. नितीन गडकरी हे obc समाजाला न्याय देईल असे वाटत असल्याचे हाके म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Laxman Hake : संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण जीव गेला तरी...; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ठणकावून सांगितलं