उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी कोल्हापुरात बार असोशिएशनचे आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2019 06:05 PM (IST)
उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आज कोल्हापूरात बार असोशिएशनने आंदोलन केले. वकिलांनी न्याय संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून कोल्हापूर खंडपीठाची मागणी मांडली.
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आज कोल्हापूरात बार असोशिएशनने आंदोलन केले. वकिलांनी न्याय संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून कोल्हापूर खंडपीठाची मागणी मांडली. मागणी कोणतीही असो, कोल्हापूरकरांना नेहमीच आंदोलन करावे लागते. आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी आज कोल्हापुरातील बार असोसिएशनने मोर्चाचे आयोजन केले होते. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने वकिलांनी सहभाग घेतला होता. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. मागणी मान्य न करुन हे प्रशासन सरकारी वकिलांच्या हेटाळणी करत असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी हे सरकार उच्च न्यायालयाला पत्र पाठवत नाही. त्यासंबधी राज्य सरकारने लवकरात लवकर न्यायालयाला पत्र पाठवावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मांडली.