एक महिन्याच्या सत्संग सोहळ्यासाठी जाधववाडी (ता. जुन्नर, पुणे) येथून 27 फेब्रुवारी रोजी पंधराशे साधूसंत सत्संग सोहळ्यासाठी राठोडा येथे आले होते. तब्बल एक महिन्याचा म्हणजे 29 मार्चपर्यंत हा महानुभव पंथाचा सत्संग सोहळा चालला होता. देशभरामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सरकारने याला अटकाव घालण्यासाठी 22 मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सत्संगासठी आलेल्या या साधूसंतांनाही याचा फटका बसला व ते राठोडा गावातच अडकून पडले होते.
आनंदाची बातमी! देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वेग मंदावला : आरोग्य मंत्रालय
याची माहिती प्रशासनाला होती. मात्र यातून कुणीही बाहेर जाणार नाही,असा प्रशासनाने निर्णय घेतला आणि ते सर्व या ठिकाणी अडकून पडले. पंधराशेपैकी काही भक्त विविध कामासाठी बाहेरगावी गेले होते. ते तिकडेच अडकले तर उर्वरित 1346 भक्त राठोडा गावात आहेत. यात 824 महिला तर 522 पुरुषांचा समावेश आहे. यात काही लहान मुलेही आहेत.
या सर्व लोकांनी प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन आहेत त्याच ठिकाणी राहायचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊन वाढल्याने लातूर जिल्ह्यात कुठेही आमची सोय करू नका आम्हाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी या साधकांनी केली. पुण्यातील जाधववाडी आश्रमात पक्के बांधकाम केलेलं आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करतोय. आम्हाला तिथं जाऊ द्या अशी मागणी महानुभाव पंथीयांकडून होत होती. अखेर या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता अडकून पडलेले तब्बल साडेतेराशे साधक आता आपापल्या घरी परतणार आहेत. मंत्रालयातून या सर्वांना सुखरूप घरी पाठण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.