लातूर : लातूरच्या बेलसांगवी गावात स्मशामभूमीच्या छत कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाला आहे.
जलकोट तालुक्यातील बेलसांगवी गावात नवीन स्मशानभूमीच्या आरसीसी छताचं बांधकाम सुरु होतं. या छताचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. मात्र बांधकाम निकृष्ठ दर्जाचं असल्यानं ते अचानक कोसळल्याचं बोलंल जात आहे. यावेळी त्याठिकाणी काम करत असलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीचा बांधकामाखाली चिरडल्यानं जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीनं पडलेले बांधकाम काढल्यावर त्याखासी अडकलेल्या एका व्यक्तीला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.