लातूरमध्ये प्रेमी युगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 04 Jun 2016 01:56 PM (IST)
लातूर : लातूर जिल्ह्यात प्रेमी युगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. चाकूर रेल्वे स्टेशनजवळ हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरखाली दोघांनी जीव दिला. आज सकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. अर्चना घुगे (वय 19 वर्ष) आणि वाल्मिक चेटमपल्ले (वय 38 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. मागील अनेक दिवसांपासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक चेटमपल्ले विवाहित होता. हे दोघे 31 मे रोजी घर सोडून पळून गेले होते. मात्र समाज आणि घराच्या विरोधाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समजतं. दरम्यान, रेल्वे पोलिस आता पुढील तपास करत आहेत.