लातूर : उदगीरच्या शिबिरात येण्याआधी तो अपंग होता... पण शिबिरातून परतला... तो थेट गाडी चालवत... लातुरात रोटरी क्लबच्या साथीनं एलएम या संस्थेनं तब्बल 204 जणांना नुसता हातच नाही, तर नवा जन्म दिला आहे.


बिदरचा रितेशही जन्मापासूनच हाताला मुकला... पण या शिबिरानं त्याला हाताची साथ दिली.. पॅरालिम्पिकसाठी तयारी करणारा बाळासाहेब हात नसतानाही पोहायचा... पण आता त्याच्या पोहण्याला या हातांनी वेग येणार आहे.

देवणीचे सर्फोद्दीन मोमीन तर 40 वर्षांनी परिपूर्ण झाले आहेत... आयुष्यातलं हे उणेपण अमेरिकन संस्था एलएम भरुन काढत आहे... रोटरी क्लबच्या साथीनं या संस्थेनं लातूरमधल्या तब्बल 204 जणांना नुसता हातच दिला नाही... तर बळही दिलं

या हाताने आता त्यांना लिहिता येणार आहे... तीन किलोचं वजन उचलता येणार आहे... ब्रश वापरता येईल... म्हणजेच दैनंदिन सगळी कामं या हाताने करता येणार आहेत...

देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता घेणाऱ्या देणाऱ्याचे हातही घ्यावे... यंदा दिवाळीत या शिबिरातून अनेकांना मदतीचा हात मिळाला... आपण या उपक्रमातून किमान दातृत्वाची प्रेरणा तरी नक्कीच घेऊ शकतो...