Lata Mangeshkar Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना 8 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत आहे. लता मंगेशकर यांनी अनेक दिवसांनंतर रविवारी रात्री जेवण केल्याची माहिती रुग्णालयातील एका सूत्राने दिली आहे. 


सूत्राने पुढे म्हटले, लता मंगेशकर यांनी बऱ्याच दिवसांनी रविवारी रात्री जेवण केले असून आज (सोमवारी) सकाळी त्यांनी नाश्ताही केला. डॉक्टरांनी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सोडण्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात राहावे लागेल.


लता मंगेशकर यांच्या घरातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लता दीदींची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी म्हणाले की, "लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे". 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता दीदींना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. 


संबंधित बातम्या


Success Story : मुलींनी आव्हाने स्विकारून सशस्त्र दलात यावे, मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या भावना यादवचे आवाहन


आधी कोरोना.. मग डेल्टा, आता ओमायक्रॉन; आणखी गंभीर रुपं घेणार कोरोना, तज्ज्ञांचा दावा


Covid-19 Vaccination : बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये होण्याची शक्यता


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha