लता दीदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, नमस्कार गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयाच उपचार घेत होते. मला न्युमोनिया झाला होता. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आज मी घरी आले आहे. माई, बाबा, देव आणि तुमचं सगळ्यांच प्रेम आणि प्रार्थनेमुळे माझी तब्येत बरी आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते.
ब्रीच कँडी मधील डॉक्टर माझ्यासाठी देवदूत आहेत. तेथील कर्मचारी वर्ग देखील चांगला आहे. मी पुन्हा एकदा तुमची आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहावे.
मध्यरात्री 2 वाजता त्यांना श्वसनाचा त्रास उद्धभवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. लता दीदींनी केलेल्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.