मुंबई : काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना आज अखेरचा निरोप दिला जात आहे. उरी इथल्या सैनिकी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले, त्यात महाराष्ट्रातील चार जवानांचा समावेश आहे.

--------------------------

लान्स नायक शहीद चंद्रकांत गलांडे यांना साताऱ्यातील जाशी या मूळगावी लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतल्या लोकांसह नेतेमंडळी हजर होती. चंद्रकांत गलांडे यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं आहेत. गलांडे यांचे तिन्ही भाऊ सैन्यदलात आहेत. त्यापैकी चंद्रकांत गलांडे हे सर्वात लहान होते.

--------------------------

उरी हल्ल्यातील शहीद पंजाब उईके यांचं पार्थिव अमरावती विमानतळावर दाखल

--------------------------



मुंबई : काश्मीरच्या उरीमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना आज अखेरचा निरोप दिला जात आहे. उरी इथल्या सैनिकी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले, त्यात महाराष्ट्रा

तील चार जवानांचा समावेश आहे.

लान्स नायक शहीद चंद्रकांत गलांडे यांच्यावर साताऱ्यातील जाशी या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

तर अमरावतीचे शहीद पंजाब उईके यांचं अमरावती विमानतळावर दाखल झालं असून काहीच वेळात त्यांच्या नांदगाव या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. तर शहीद विकास कुळमेथे यांना यवतमाळमधील त्यांच्या मूळगावी अखेरचा निरोप देण्यात येईल.

दरम्यान, उरीमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप ठोक यांना सोमवारी अखेरचा सलाम देण्यात आला. नाशिकच्या खडांगळी या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

पाकिस्तानचा भ्याड हल्ला

बारामुल्लाच्या उरी इथल्या सैनिकी मुख्यालयावर दहशतवाद्यांनी बेसावध असणाऱ्या जवानांवर 18 सप्टेंबर रोजी गोळीबार आणि हँण्डग्रेनेडने हल्ला केला. ज्यात एकूण 18 जवान शहीद झाले. महाराष्ट्राच्या चार जवानांना वीरमरण दिलं. राज्य सरकारने पीडित कुटुबांना प्रत्येकी 15 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी

सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे. सीमारेषेवर अतिरिक्त कुमक पाठवून भारत सरकारनं नेहमी होणाऱ्या या हल्ल्यांविरोधात ठोस पावलं उचलावीत, असं मत सैन्यदलाकडून व्यक्त केलं जात आहे. 26/11 ते पठाणकोट हल्ला, आणखी किती सहन करायचं असा सवाल सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तानची भारताला आण्विक हल्ल्याची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा सीमेत कोणी पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करण्यासाठीही घाबरणार नाही, असं आसिफ यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :


नाशिकचे शहीद जवान संदीप ठोक यांना अखेरचा सलाम


वरातीऐवजी अंत्ययात्रा, नाशिकचे शहीद ठोक यांचं कुटुंब शोकसागरात


दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी राजकीय हालचालींना वेग


पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या भारताच्या मोहिमेला पहिलं यश!


”जर कुणी एक दात पाडला, तर त्याचा पूर्ण जबडाच तोडा”


उरी हल्ल्यावर अनुष्काला भावना अनावर


हृदय पिळवटून टाकणारे वीरुचे ट्वीट


उरीच्या सैन्यतळावर पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज


पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी


उरीमधील भ्याड हल्ल्यात भारताने कोणाला गमावलं?


उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद


जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद


उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती


पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी