सांगली : राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख असणारे 'आबा'. कॅन्सरमुळं काही वर्षांपूर्वी ज्यांनी या जगाचा आणि जनसामान्यांचा निरोप घेणाऱ्या अशा आर. आर. पाटील यांचा आज स्मृतिदिन.


राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांची पुण्यतिथी असल्यामुळं आबांच्या स्मृतिंना आज उजाळा दिला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारया आबांचे आकस्मिक जाणे, मनाला चटका देणारे होते. आजही आबांच्या आठवणींनी अनेक जण गहिवरून जातात, त्यांच्या या स्मृतीदिनानिमित्ताने आबांनी निधनाच्या चार दिवस आधी राज्याच्या काळजी विषयी लिहलेली एक चिट्टी समोर आली आहे.
आर. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आबांच्या अनेक आठवणीना आज विविध पध्दतीने उजाळा दिला जातोय. आर आर पाटील यांनी लिहलेल्या चार ओळीचा कागदाचा फोटो यावेळी व्हायरल झाला आहे.


In Pics | पाहा अशा प्रकारे माघारी जातंय चीनचं सैन्य


विशेष म्हणजे आर. आर. पाटील यांनी लिहलेलं हे पत्र म्हणजे त्यांच्या लेखणीतील शेवटच्या ओळी ठरल्या होत्या. कारण यानंतर आर. आर. पाटील यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि पुढे 16 फेब्रुवारी रोजी आबांची कॅन्सरशी झुंज व्यर्थ ठरली. बोलता येत नसल्याने आणि हाताला सूज असताना देखील आबांनी एका कागदावर लाल अक्षरांनी 'राज्यात काय चाललंय? असे लिहलं होतं. याबाबत आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी विचारले असता, आबांसोबत स्मिता आणि आबाचे भाऊ राजाराम पाटील होते. आबांनी या दोघांकडे राज्यात काय चाललंय असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी स्मिताने राज्यात सुरू असलेली परिस्थिती कथन केली होती.



आर. आर. आबांच्या निधनाच्या चार दिवस आधी त्यांना बोलता येत नव्हतं. तरीही आबांना राज्याची काळजी होती आणि त्यातूनच हात सुजलेले असताना देखील आबांनी ते जाणून घेण्यासाठी "राज्यात काय चाललंय"अशा प्रकारचं प्रश्नार्थक वाक्य "त्या" चिठ्ठीवर लिहिलं होतं, शेवटच्या क्षणापर्यंत आबांना राज्यातल्या जनतेच्या विषयी असणारी काळजी चिठ्ठीत लिहलेल्या त्या चार वाक्यातून दिसते. अशी ही आबांची शेवटची आठवण असणारी चिट्टी आता समोर आली आहे. आबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आबांची कन्या स्मिता पाटील आणि त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून ही आबांची हस्तलिखित चिट्टी पोस्ट करत या असामान्य नेत्याला, आबांना एक प्रकारे श्रद्धांजलीच वाहिली आहे.