Majha Katta "वडील ट्रम्पेटवादक होते, परंतु, मला व्हायोलिनची आवड होती. वडिलांमुळे मला भारतीय आणि वेस्टर्न संगीत शिकता आले. संगीत हा माझा छंद आहे. त्यामुळे मी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत रियाज करत बसायचो. वडिलांनी दोन दिवसांत वेस्टर्न संगीत शिकवले. शिवाय मला मिळालेल्या सर्व गुरूंनी खूप चांगल्या प्रकारे संगीत शिकवले, असे लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीत जोडीतील ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांनी सांगितले. एबीपी माझाच्या (ABP majha) 'माझा कट्टा' (majha katta ) या कार्यक्रमामध्ये प्यारेलाल शर्मा  (pyarelal sharma) आणि त्यांच्या पत्नी सुनिला शर्मा यांनी लक्ष्मीकांत -प्यारेलाल जोडीचा स्वरप्रवास यांनी सांगितला. 


लक्ष्मीकांत -प्यारेलाल या जोडीने तब्बल 600 सिनेमांना संगीत देले आहे. त्यांच्या याच स्वरप्रवासातील आठवणींना प्यारेलाल शर्मा यांनी आज 'माझा कट्या'वर उजाळा दिला. प्यारेलाल शर्मा यांना सहा भाऊ आणि दोन बहिणी होत्या. हे सर्व बहिण भाऊ  संगीत क्षेत्रात आहेत. संगीत आमचा छंद असून संगीतामुळे आम्हाला खूप प्रेम करणारे लोक मिळाले, अशा आठवणी प्यारेलाल शर्मा यांनी सांगितल्या.   


प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी नोटेशन कसे करायचे ते त्यांच्या वडिलांनी अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला आणि ते तंत्र  आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलाल यांच्या हातांत व्हायोलिन दिले, अशी आठवण प्यारेलाल यांनी सांगितली.  


सुरूवातीच्या काळात सिनेमेच मिळत नव्हते. परंतु, 'पारस मनी' सिनेमा मिळ्यानंतर त्यांच्याकडे अनेक सिनेमे येऊ लागले. हाच सुरूवातीच्या काळातील प्रवास सांगताना प्यारेलाल शर्मा म्हणाले, "पहिल्यांदा आम्हाला जास्त सिनेमे मिळत नव्हते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर 'पारस मनी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमातील गाण्यांमुळे आम्हाला परत खूप सिनेमे मिळाले. त्यानंतर आम्ही वर्षाला 20-20 सिनेमे करू लागलो."


संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची जोडी खूप भावते. परंतु, हे दोघे जण एकत्र कसे आले? आणि संगीतातील त्यांचा प्रवास सांगाताना प्यारेलाल यांनी सांगितले, "लक्ष्मीकांत खूप छान गात होते. त्यांचा आवाज खूप चांगला होता. दोघांनाही संगीताची आवड असल्यामुळे आमच्या दोघांचे खूप चांगले जमत असे. आम्ही दोघांनी खूप समजून घेऊन काम केले. संगीतामुळे आम्ही दोघे एकत्र आलो. दोघांमध्ये खूप प्रेम होते. लक्ष्मीकांत प्रत्येक गोष्टीत मन लावून काम करायचे, हीच त्यांची गोष्ट मला खूप भावली आणि आमचा संगीतातील प्रवास सुरू झाला"



महत्वाच्या बातम्या


Mee Vasantrao : 'प्रेक्षकांकडून दोन मिनिटांमध्ये टाळ्या घेऊ शकतो पण... ': राहुल देशपांडे