Mee Vasantrao : 'मी वसंतराव' (Mee Vasantrao) हा चित्रपट एक एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्यानिमित्तानं तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'मी वसंतराव' या चित्रपटामधील कलाकार राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी  एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी मी वसंतराव या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से आणि गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनाबद्दल सांगितले. 


माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये जेव्हा राहुल देशपांडे यांना प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देताना सांगितलं की, प्लेइंग टू द गॅलरी हे मला कधीच करायचं नाही. मी प्रेक्षकांनी सांगतो की मी तुमच्याकडून दोन मिनीटांमध्ये टाळ्या मिळवू शकतो. दाखवतो मी तुम्हाला गाणं गाऊन दाखवतो. पण हे गाणं नाही. धिस इज प्लेइंग टू द गॅलरी'. 


लावणीच्या सीनचा किस्सा 

तसेच चित्रपटामधील लावणीचा सीन हा अत्यंत अवघड होता, असं ही राहुल यांनी सांगितलं. लावणीच्या सीनबद्दल राहुल म्हणाले, 'हा सीन शूट करण्याआधी मी खूप चिंतेत होतो. कारण ज्या ठिकाणी तो सीन शूट होणार होता ती जागा लाहान होती. मी निपुणला सांगितलं की, हा सिन शूट होत असताना शूटिंग सेटवर फार कमी लोक असावेत.  '


दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीनं देखील चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले काही किस्से सांगितले. वसंतराव देशपांडे यांच्या रेकॉर्डिंग्स निपुणनं ऐकल्या. त्यानंतर त्यानं असं ठरवले की वसंतरावांच्या आयुष्यातील संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून मांडायचा. लोकांनी न पाहिलेले किंवा लोकांना माहित नसलेले पु.ल. देशपांडे आणि वसंतराव देशपांडे या चित्रपटामधून प्रेक्षकांना दाखवण्याचे ठरवले होते', असं निपुणनं सांगितलं. 


वसंतराव आणि नागपूरचं नात 
वसंतराव देशपांडे आणि नागपूरच्या नात्याबद्दल राहुल देशपांडे यांनी सांगितलं, 'वर्धा तसेच नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरात जेव्हा वसंतराव जायचे तेव्हा ते नागपूरच्या भाषेमध्ये बोलायचे वर्षातून तीन ते चार वेळा ते नागपूरला जायचे तिथे त्यांचे शिष्य देखील होते. त्यांचे मित्र देखील तिथे होते. पण घरी कुटुंबातील व्यक्तींना ते नागपूरचे किस्से कधी सांगयचे नाही'


राहुल देशपांडे यांच्यासोबतच अभिनेता अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, अनिता दाते यांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha