नांदेड : रेल्वेतून जनरल डब्यानं प्रवास करा किंवा एसी डब्यातून, अनेकदा तुम्हाला कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. औरंगाबादेत नोकरीला असणाऱ्या डॉ. अश्विनी कुलकर्णी यांना अशाच एका प्रसंगाला तोंड द्यावं लागलं.

 
भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत औरंगाबादमध्ये नोकरी करणाऱ्या अश्विनी कुलकर्णी नांदेडहून औरंगाबादला निघाल्या होत्या. बी-1 या थ्री टायर एसीत त्यांच्यासोबत नांदेडची एमबीबीएस विद्यार्थी आणि तिच्या सहा डॉक्टर मैत्रिणी प्रवास करत होत्या.

 

एअर इंडियात इंजिनिअर असलेला संबंधित प्रवासी नांदेडहून मुंबईला प्रवास करत होता. नांदेडून मुंबईला सुटणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये 17 ऑगस्टला ही घटना घडली. प्रवास सुरु होताच तो वॉशरुममध्ये गेले. बिस्लेरीच्या बाटलीत मद्य भरुन घेतले आणि रेल्वेनं गती पकडताच सहप्रवाशांसमोरच त्याने मद्यपान सुरु केलं.

 
अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडल्यामुळे डॉक्टर मुलींनी आपला बर्थ सोडून दिला. मात्र अश्विनी कुलकर्णी यांनी या महाशयांचा एक फोटो काढला. संबंधित व्यक्तीने लाज सोडत फोटोसाठी पोजही दिली. हाच फोटो अश्विनी यांनी रेल्वेमंत्र्याला ट्विटरवर टॅग केलं.

 

अर्ध्या तासात कुलकर्णींना रेल्वेमंत्र्यांकडून प्रकरण नांदेड डीआरएमकडे पाठवण्यात आल्याचा रिप्लाय आला. अर्ध्या तासात टीसींनी मद्यप्राशन करुन प्रवास करणाऱ्या या महाशयाला सेलुच्या रेल्वे स्टेशनवर खाली उतरवलं.

 
पुढे त्या महाभागावर कारवाई झाली का? की त्याला नुसतीच तंबी देऊन सोडून देण्यात आलं, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

 

 

https://twitter.com/Ashwini_CK/status/765891974599700480

 

https://twitter.com/RailMinIndia/status/765901151661199360

 

https://twitter.com/Ashwini_CK/status/765937115905523712