मुंबई : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri mazi ladki bahin yojana)   मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेची महाराष्ट्र राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा झाली. घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासात या योजनेचा शासन निर्णय निघाला आणि योजनेसाठी अर्ज मागवलेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. महिलांच्या  अर्थिक  स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणासाठी महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्या अरज मागवण्यात  आले आहे.   या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज मागवले जात असून 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. या मुदतीत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत.  या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांसाठी पात्र ठरणार आहेत.


काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना माझा नमस्कार! ताई तुमच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद... ताई कोणीही कितीही विरोधात बोलले तरी तू काळजी करु नको.. राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुझ्या अर्थिक  स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणासाठी तुला महिन्याला 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18000 रुपये देण्याचा निर्णय या भावाने घेतला आहे.  योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून अर्जाची मुदत वाढवून ती 31 ऑगस्ट करण्यात आली आहे.  ज्या भगिनी 31 ऑगस्टला नोंदणी करतील त्यांना देखील जुलैपासूनचे पैसे देण्यात येणार आहे. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी नवे संकेतस्थळ


सरकारने योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करता येत होता. मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन, लोड आल्याने संकेतस्थळ बंद या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे  सरकारने नवे संकेतस्थळ  सुरू केले आहे.  महिलांना  आता हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही पटापट  भरता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरता www.ladkibahin.maharashtra.gov.in   संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.  


योजनेचे अर्ज कुठे आणि कसा भरायचा? 


योजनेसाठीचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल. 


अर्ज भरताना कोणती कागदपत्रं लागणार?  



  • आधारकार्ड 

  • रेशनकार्ड 

  • उत्पन्नाचा दाखला 

  • रहिवासी दाखला

  • बँक पासबुक 

  • अर्जदाराचा फोटो

  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र

  • लग्नाचं प्रमाणपत्र


ladki bahin yojana Video: बहिणींनो, वर्षाला 18 हजार खात्यातयेणार, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?



 


हे ही वाचा :


दीड हजार रुपयांसोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडरही मोफत मिळणार; योजनेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?