मुंबई : लाडकी बहीण योजनेतील सोळा लाख अर्जांची होणार छाननी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आचारसंहितेच्या आधी 16 लाखांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. या सोळा लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे. 


आतापर्यंत राज्यातील दोन कोटी 34 लाख लाभार्थ्यांना लाडकी बहिणी योजनेचा (Ladki Bahin Yojana) फायदा मिळाला आहे. यात सोळा लाख अर्जांची छाननी झाल्यानंतर पुन्हा एकदा संख्या वाढणार आहे. निवडणूक काळात प्रशासन व्यस्त असल्याने या सोळा लाख अर्जांची छाननी बाकी होती. त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता. आता या सर्व अर्जांची छाननी करून या लाभार्थ्यांना  लाभ दिला जाणार आहे. 


अफवांवर विश्वास ठेऊ नका, अदिती तटकरेंचे आवाहन 


लाडक्या बहिण योजनेवरुन वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत असं अदिती तटकरे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या योजनेसंदर्भात कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कोणतेही आदेश, शासन निर्णय, निकष बदल विभागाने काढलेले नाहीत. विनाकारण काही अफवा पसरवल्या जात आहेत. लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी कोणतीही मनामध्ये शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता-भगिनी साठी काढलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या चालू राहणार आहे."


जुन्या अर्जांची छाननी होणार नाही


आदिती तटकरे यांनी या आधीही लाडकी बहीण योजनेवरून स्पष्टीकरण दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, "लाडकी बहीण योजने जवळपास दोन कोटी 34 लाख महिला लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नाही. छाननीबाबत चुकीचे वृत्त समोर येत आहे. या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या अर्जांबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबतसंबंधित विभाग निर्णय घेईल. पण सध्यातरी अर्जांच्या छाननीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या मी त्या विभागाची मंत्री नाही. मात्र मी जेव्हा मंत्री होते, त्यावेळी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना याआधीच अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे."


ही बातमी वाचा: