Kunal Patil : भाजपने (Bjp) धुळ्यात (Dhule) काँग्रेसला (congress)  मोठा धक्का दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते आणि धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil)  हे 75 वर्षांची काँग्रेसची साथ सोडणार आहेत. ते उद्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती खुद्द पाटील यांनी दिली आहे. माझ्या आजोबांपासून काँग्रेस पक्षामध्ये मी आहे. आमचे विचार काँग्रेसचे आहेत, मात्र दूरदृष्टी ठेवून मी भाजप पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. आपण काँग्रेस पक्षाशी 70 वर्षापासून एकनिष्ठ आहोत, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं अवघड असतं असेही पाटील म्हणाले.

काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला

माझं थेट राहुल गांधींची या संदर्भात बोलणं झालं नाही पण काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांची माझी चर्चा झाली आहे. त्यांना मी माझी अडचण सांगितल्याचे कुणाल पाटील म्हणाले. काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे. उत्तर महाराष्ट्र खरंतर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र याच उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झालं आहे.  अगदी इंदिरा गांधी सुद्धा महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करायच्या मात्र आता हा भाग दुर्लक्षित झाल्याचे कुणाल पाटील म्हणाले. 

काँग्रेसमध्ये असताना मी माझं काम चोखपणे पार पाडलं

काँग्रेसमध्ये असताना मी माझं काम चोखपणे पार पाडलं आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर विचारात घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे कुणाल पाटील म्हणाले. आपण काँग्रेस पक्षाशी 70 वर्षापासून एकनिष्ठ आहेोत, आता त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं अवघड असतं. मात्र आपल्या भागात विकास होण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती कुणाल पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 

लहानपणापासून पाहिलं की काँग्रेस हा आपला पक्ष आहे आणि काँग्रेसशीच आपण एकनिष्ठ राहायच. आपल्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. अशा प्रकारची भावना घेऊनच आम्ही लहानचे मोठे झालो. माझे आजोबा पंडीत नेहरू यांच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले खासदार होते. आमच्या वडिलांनी ती ख्याती पुढे चालू ठेवली. तेही 7 वेळा आमदार झाले होते. मी पण 2014 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढलो. फार मोठ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं. 2019 मध्येही लोकांनी माझी साथ दिल्याचे कुणाल पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Nashik News: अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश, कुणाल पाटील, अपूर्व हिरेंच्या हातात कमळ?