Dahi Handi Celebration Live Updates : गोविंदा आला रे... दोन वर्षांनी पुन्हा ढाक्कुमाकुम! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला, दहीहंडीसंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
Dahi Handi 2022 Live Updates : राज्यभरात दोन वर्षानंतर 'ढाक्कुमाकुम'चा सूर उमटू लागला आहे. गोविंदा पथकं थर लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीसंदर्भातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
रत्नागिरी जिल्ह्यातील पाज पंढरी गावातील वसंत लाया चौगले या गोविंदाचा नाचताना हृदयविकाराने मृत्यू झाला. हर्णै पाज पंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह गेला पोहोचला होता यामध्ये चौगुले सहभागी झाले होते.
पालघर जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर या वर्षी पालघरमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील कोळी वाड्यातील दहीहंडी पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. या भागात पारंपरिक पद्धतीने लाकडी खांबावर वर्तुळाकार आकारात 101 दहीहंडी बांधण्यात येतात. हंडी बांधल्यानंतर खांबाला वंगण म्हणजेच ग्रीस लावण्यात येते. स्थानिक कोळीबांधव गोविंदा या लाकडी खांबाभोवती वर्तुळाकार पद्धतीने एकत्र येत एकमेकांच्या खांद्यावर चढत हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. अखेर 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर गोविंदांना हंडी फोडण्यात यश येते.
घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात अंध मुलांनी चार थरांची सलामी दिली आहे. कला संजीवन फाउंडेशनच्या पथकांचे हे अंध गोविंदा आहेत. त्यांनी घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात ही सलामी दिली. सर्व उपस्थित गोविंदानी त्यांच्या या प्रयत्नांना टाळ्यांचा गजरात प्रतिसाद दिला आहे. नेत्रदान करा हा संदेश देत हे पथक आज मुंबईत ठिक ठिकाणी दहीहंडी थर लावत आहे.
CM Eknath Shinde : आम्हीही दीड महिन्यापू्र्वी हंडी फोडली. कठीण असतानाही 50 थर लावले. ठाण्यातील टेंभीनाकाच्या दंहीहंडीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या सत्तांतरावर मिश्किल भाष्य केलं. यावेळी उपस्थितांंमध्ये एकच हाशा पिकला.
संपूर्ण मुंबईमध्ये आज दहीहंडीची धूम सुरू आहे. घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते मंडळी उपस्थित रहाणार आहेत, तर या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम उपस्थित झाले आहेत. त्यांनी विविध गाण्यांवर ठेका धरत या ठिकाणी डान्स ही केला आहे. यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने आज दोन वर्षानंतर हा जल्लोष हंडीत दिसतो आहे. तो चित्रपट थिएटरमध्ये ही दिसावा अशी आशा व्यक्त केली आहे. तर राखी जाधव यांनी पथकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची हंडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडली.
ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीला सुरुवात झाली आहे. दोन वर्षानंतर दहिहंडी उत्सव पार पडत असल्याने गोविंदा पथकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायाला मिळतोय. या दहिहंडीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक सेलिब्रिटी ही उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी थर लावण्याचे प्रयत्न सुरूअसताना दुपारी बारा वाजेपर्यंत 12 गोविंदा जखमी झाले आहेत.
देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सुरू आहे. यातच मुंबईमध्ये ठीकठिकाणी दहिहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. याचं निमित्तानं महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एका वेगळ्या दहिहंडीला हजेरी लावली होती. मुंबईतील डोंगरी भागात असणाऱ्या बालसुधारगृहातील बच्चेकंपनीसोबत मंगल प्रभात लोढा यांनी आज दहिहंडी साजरा केली. महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आजच्या अनोख्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील डोंगरी परिसरातील दि चिल्ड्रेन्स एड सोसायटी बालसुधार गृहात दहिहंडी आयोजन केले होते.
Konkan Dahi Handi : कोकणात आता दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा जाहीर कार्यक्रम आज गोपाळकाल्याचे औचित्य साधत रंगणार आहे. यावर्षी लाखो रुपयांच्या बक्षीसांची चढाओढ जिल्ह्यात चर्चेत राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात रंगताना पाहायला मिळणार आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांचा हा दापोली हा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेच्या कदम गटाची दहीहंडी असते तशी यंदाही आहे पण यंदा प्रथमच ठाकरे गटाबरोबर असलेल्या सूर्यकांत दळवींनीही टस्सल देण्यासाठी दहीहंडी उत्सवात दरवर्षी एक लाख असलेले बक्षीस तीन लाख एकावन्न हजार ठेवले आहे.
Mumbai Dahi Handi : देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सुरु आहे. यातच मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहिहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. याच निमित्ताने राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एका वेगळ्या दहिहंडीला हजेरी लावली होती. मुंबईतील डोंगरी भागात असणाऱ्या चिल्ड्रेन्स अँड सोसायटी बालसुधार गृहातील बच्चे कंपनीसोबत मंगलप्रभात लोढा यांनी आजचा दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी दहीहंडीचे थर लावण्यासाठी लहान मुलांचा वापर करु नका, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलं.
मुंबईत आज सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतानाच या सोहळ्याचा उत्साह चाळींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतं आहे. वरळीतील सेंच्युरी मिल कॉलनी बावन चाळ येथे
प्रगती क्रीडा मंडळाने आज आपला पन्नासावा दहीहंडी उत्सव साजरा केला. सेंच्युरी कॉलनी येथे 1973 साली या सोहळ्याला स्थानीक गिरणी कामगारांनी सुरुवात केली होती. तेव्हापासुन मोठया उत्साहात लहानांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वजण मोठया संख्येने या उत्साहात सहभागी होत असतात.
थोड्याच वेळात प्रताप सरनाईक यांच्या दहिहंडीच्या ठिकाणी थर लावले जातील.
प्रताप सरनाईक यांच्या दहिहंडीसाठी दुपारी 12.30-1 वाजेच्या सुमारास अभिनेता अर्जुन कपूर दाखल होईल.
त्यानंतर दुपारी हळूहळू एक-एक सेलिब्रिटींचे आगमन बघायला मिळेल.
संध्याकाळच्या सुमारास अभिनेता सुनील शेट्टी हजेरी लावणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील संध्याकाळच्या सुमारास दाखल उपस्थित राहणार आहेत.
जय जवान गोविंदा पथकाची पहिली सलामी मनसेच्या हंडीला देणार आहे. मनसेचे मोहन चिराथ यांच्या यांच्या वतीने भांडुप गाव येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक नऊ थरांची सलामी देऊन हंडी फोडणार आहे. जय जवान गोविंदा पथकाने या आधी नऊ थरांचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आणि या ठिकाणी देखील ते नऊ थर लावून ही पहिली हंडी फोडून यंदाच्या उत्सवाचा शुभारंभ करणार आहेत.
कोरोनानंतर यावर्षी सर्वत्र दहीहंडी उत्सवाच आयोजन करण्यात आले आहे. यात मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाणारी आमदार राम कदम यांच्या दहीहंडीच देखील आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेल आहे. या दहीहंडीच्या ठिकाणी ढोल ताशे पथक आणि विविध वेशभूषा केलेले लहानगे गोविंदा हे आकर्षण ठरत आहेत. या दहीहंडी स्थळी हळूहळू गोविंदा पोहोचत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावणार आहे. काहीच वेळात या गोविंदा उत्सवाला सुरुवात होणार आहे.
टेंभी नाका इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी मध्ये लावण्यात आलेले बॅनर देखील राजकारणाचा विषय ठरत आहेत, इथे लावण्यात आलेल्या आठ वेगवेगळ्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली विधाने दर्शवली आहेत त्याखाली बाळासाहेब ठाकरे यांची सही देखील बघायला मिळतेय, इथूनच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांच्या निष्ठेच्या हंडीला या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या गटाने उत्तर दिले आहे,
Bhandup MNS Dahi Handi : मुंबई उपनगरात 'जय जवान' पथकाने पहिली सलामी मनसेच्या हंडीला देण्यात येत आहे. मनसेचे मोहन चिराथ यांच्या वतीने भांडुप गाव इथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक नऊ थरांची सलामी देऊन हंडी फोडणार आहे. जय जवान पथकाने या आधी नऊ थरांचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. या ठिकाणी देखील ते नऊ थर लावून ही पहिली हंडी फोडून यंदाच्या उत्सवाचा शुभारंभ करणार आहेत.
Ghatkopar Dahi Handi : कोरोनानंतर यावर्षी सर्वत्र दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. यात मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाणारी आमदार राम कदम यांच्या दहीहंडीचं देखील आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे. या दहीहंडीच्या ठिकाणी ढोल ताशे पथक आणि विविध वेशभूषा केलेले लहानगे गोविंदा हे आकर्षण ठरत आहेत. या दहीहंडी स्थळी हळूहळू गोविंदा होत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावणार आहे. काहीच वेळात या गोविंदा उत्सवाला सुरुवात होणार आहे
गोविंदा पथकं मनोरे रचण्यासाठी सज्ज
दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते. या उत्सवाची धूम काही वेगळीच असते. रिमझिम पाऊस, उंच आकाशात बांधलेली दहीहंही, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसणारी गोविंदा पथकं, गाण्यावर ताल धरणारे गोविंदा, मानवी मनोरे असं सगळं चित्र फारच आल्हाददायक असतं. दहीहंडी उत्सवात ज्याप्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखीलल सुरू करण्यात येते.
देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत.
पार्श्वभूमी
Dahi Handi Celebration Live Updates : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीची विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते. या उत्सवाची धूम काही वेगळीच असते. रिमझिम पाऊस, उंच आकाशात बांधलेली दहीहंही, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसणारी गोविंदा पथकं, गाण्यावर ताल धरणारे गोविंदा, मानवी मनोरे असं सगळं चित्र फारच आल्हाददायक असतं. दहीहंडी उत्सवात ज्याप्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखीलल सुरू करण्यात येते.
यंदा नऊ थर लावण्याचा विक्रम मोडणार?
एक,दोन तीन, चार , पाच अशा थरांचा थरार या दहीहंडी उत्सवात पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे... जास्तीत जास्त थर लावता येतील यासाठी मागील दोन महिन्यापासून मुंबईतलं नावाजलेला 'जय जवान' गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडी साठी खास तयारी करत आहे... कारण याच गोविंदा पथकानं आतापर्यंत सर्वाधिक 9 थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे...शिस्त, सातत्य, मेहनत या बळावर दरवर्षी गोविंदा पथक विशेष छाप पाडतय... त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सरावात सुद्धा या पथकाने चार वेळेस नऊ थर लावले आहेत... त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा उत्तराचा आपलाच विश्वविक्रम मोडीत काढणार का ? याची उत्सुकता प्रत्येकाला असेल.
गोविंदा पथकं सज्ज
जय जवानच नाही तर मुंबई ठाण्यातील 200 पेक्षा अधिक गोविंदा पथक सुद्धा अशाच प्रकारे सराव करत आपला उत्साह वाढवताय.. कारण दोन वर्षांनंतर जेव्हा अशाप्रकारे थाटामाटात दहीहंडी उत्सव होतोय तेव्हा आधीपेक्षा अधिक थोर लावण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक प्रयत्न करणार आहे... कारण तशा प्रकारची भरगोस बक्षीस सुद्धा आयोजकांनी ठेवल्याने त्याचे विशेष आकर्षण असणार आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -