अहमदनगर : कोपर्डी खटल्याचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी श्रीगोंदा ते कोपर्डी ही बससेवा परिवहन महामंडळानं बंद केली आहे. विशेष म्हणजे, याबाबत परिवहन विभागाकडून याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.


कोपर्डीच्या घटनेनंतर भीतीपोटी अनेक मुलींनी शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे श्रीगोंद्याहून कुळधरण, कोपर्डी आणि पुढे शिंदा अशी बस सुरु करण्यात आली होती. मात्र 29 तारखेला कोपर्डीचा निकाल लागताच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 तारखेलाच महामंडळानं ही बस कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केली.

वास्तविक, कोपर्डी गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी कोपर्डीतल्या मुलांना कुळधरण, शिंदा याठिकाणी जावं लागतं. या प्रवासादरम्यान रस्त्यात जंगल आणि झाडा-झुडपांचा असल्यानं, अऩेक मुलींनी भीटीपोटी शाळा बंद केल्या होत्या.

पण कोपर्डीचा निकाल लागताच शाळेत जाण्यासाठी उपयोगी असणारी बस बंद केल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.