कोपर्डी बलात्कार : आरोपींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 08:11 AM (IST)
अहमदनगर : कोपर्डी बलात्कारातील दोन आरोपींची पोलीस कोठडी 30 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांची पोलीस कोठडी आज संपली होती. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी जिल्हा सत्र न्यायलयाने दोन्ही आरोपींची कोठडी वाढवली. दरम्यान आज आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं, त्याचवेळी या नराधमांना रोषाला सामोरं जावं लागलं. न्यायालयीन परिसरात काही महिलांनी आरोपींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आधीच दक्षता घेतल्याने, अनर्थ टळला.