सिंधुदुर्ग : गणेशोत्सवाच्या सलग दुसऱ्या दिवशीही कोकणरेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला मिळत आहे. आजही कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे दीड दिवसाचे गणपती आटोपून परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वेमार्गावर जादा गाड्या सोडल्या जातात. मात्र कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर मार्गावर एकेरी रेल्वे ट्रॅक असल्यामुळे ट्रेन बंचिंगच्या समस्येला कोकण रेल्वेला सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे कोकण रेल्वेच्या या एकेरी ट्रॅकवर सध्या दिवसाला सुमारे 90 गाड्या धावत असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या गाड्या किती उशिराने?
10111 डाऊन कोकणकन्या एक्स्प्रेस - 3 तास उशिरा
01001 शिवाजी टर्मिनस सावंतवाडी गणपती विशेष - 1.30 तास उशिरा
01013 शिवाजी टर्मिनस सावंतवाडी विशेष गाडी - 1.50 तास उशिरा
01037 एलटीटी पेरणम स्पेशल - 2.50 तास उशिरा
09007 मुंबई सेंट्रल थिविम - 1.40 तास उशिरा
50101 रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर - 2 तास उशिरा
लांब पल्ल्याच्या कोणत्या गाड्या किती उशिराने?
09002 मेंगलोर-मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन - 4.15 तास
12202 गरीबरथ एक्स्प्रेस - 1 तास उशिरा
12617 मंगला एक्स्प्रेस - 1.10 तास उशिरा
16346 नेत्रावती एक्स्प्रेस - अर्धातास उशिरा
19423 तिरुनवेली गांधीधाम - 1.10 तास उशिरा
22475 बिकानेर कोइंबतूर - 1 तास उशिरा
ट्रेन बंचिंगमुळे सध्या कोकण रेल्वेवरील गाड्या उशिराने धावत असल्या तरी गाड्या वेळेवर धावण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. तरी सर्व प्रवाश्यांची कोकण रेल्वेला सहकार्य करण्याचे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात येत आहे.