कोल्हापूर : इमारत फी सक्तीने वसूल केल्याचा आरोप करत युवासेनेने कोल्हापुरातील होली क्रॉस शाळेच्या ऑफिसची तोडफोड केली. या तोडफोडीत शाळेच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.
कोल्हापूर शहरात होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या फीमध्ये इमारत निधीच्या नावाखाली अचानक सात ते दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली. विद्यार्थी आणि पालकांकडून ही वसुली सक्तीने होत असल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली होती.
युवासेनेच्या वतीने शाळा प्रशासनाला निवेदन देऊन ही सक्तीची इमारत फी वसूल करुन नका, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानंतर युवसेनेच्या वतीने शाळेच्या मुख्य कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनही करण्यात आलं, परंतु शाळा प्रशासनाचे डोळे काही उघडले नाहीत.
इमारत निधीच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांना सक्तीची वसुली सुरुच राहिल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी होली क्रॉस शाळेच्या मुख्य कार्यालयावर हल्लाबोल केला आणि तोडफोड करत आपला संताप व्यक्त केला.
इमारत फीच्या नावे सक्तीची वसुली, युवासेनेकडून होली क्रॉस शाळेत तोडफोड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 04:07 PM (IST)
कोल्हापूर शहरात होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या फीमध्ये इमारत निधीच्या नावाखाली अचानक सात ते दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली. युवासेनेने सक्तीच्या वसुलीबाबत निवेदन देऊनही शाळा प्रशासनाने काहीच निर्णय न घेतल्याने कार्यालयाची तोडफोड करण्यात आली
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -