कोल्हापूर : गृहपाठ न करणं एका विद्यार्थिनीच्या जीवावर उठलं आहे. गृहपाठ न केल्यामुळे आठवीतल्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांनी तब्बल 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचं समोर आलं आहे.
कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये राहणारी विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे. चंदगड तालुक्यातल्या कानूरच्या भावेश्वरी विद्यालयात आठवीत शिकणारी विजया चौगुले कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात दाखल आहे.
ना तिचे पाय जमिनीवर स्थिर राहत आहेत, ना पायातील कळा थांबत आहेत... तिची ही अवस्था तिच्या मुख्याध्यापकांनी केल्याचा आरोप तिने केला आहे.
त्याच शाळेत शिपाई म्हणून कामाला असलेले तिचे वडील आधी शांत राहिले, पण विजयाची अवस्था बिघडल्यामुळे त्यांनी शाळेची तक्रार केली आहे.
विजयाला फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक इजा झाली असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी करण्याची गरज आहे. कारण खरीच अशी शिक्षा दिली असेल, तर ते मुलांच्या दृष्टीने धोकादायक आहे.
गृहपाठ न केल्याने कोल्हापुरात विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Dec 2017 07:47 PM (IST)
कोल्हापुरात चंदगड तालुक्यातल्या कानूरच्या भावेश्वरी विद्यालयात आठवीत शिकणारी विजया चौगुले सीपीआर रुग्णालयात दाखल आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -