घरात घुसलासा... तर बगाच... पाटी वाचाय न्हाईसा.. कोंबड्यापासनं सावध राहा... व्हय व्हय... कोंबड्यापासनंच.. कुत्र्यापासनं न्हंवं.. ती कुत्री नुसती भुकत्यात... आमचा गब्बरसिंग मागं लागतोय... मागं लागला... की पाय लावून पळायचं... न्हाई तर टोचा मारुन वाट लावतंय...
कोल्हापुरातल्या बावड्यात दहशत हाय भावाची... लाल भुंद तुर्रार्रा... गळ्याला राजकुमारसारखी सोनेरी मफलर... आणि सकाळी केकाटलं.. की आख्ख्या बावड्याला उटीवतंय...
गेटमधनं कोन येताना दिस्ला... विषय सप्ला... गब्बरसिंग तेला पळवून लावतंय... खरं तर गटारीलाच तेची तंगडी लटकली असती... गब्बरचा पांडरा रस्सा झाला आस्ता... पन गब्बर फेमस झाला... आनी मालकानं चिकनचा बेत रद्द केला...
काय करनार भावा... पावसाळा आसू दे न्हाईतर हिवाळा... आमचा नादच निराळा..