काल (7 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजन झाल्यानंतर संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शशिकांत खवरे यांनी कार्यकर्त्यांसह उत्साहाच्या भरात डबलबारी बंदूक आणि पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला. भररस्त्यात केलेल्या कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
शशिकांत खवरे हे लोकनियुक्त सरपंच आहेत. म्हणजेच त्यांना या परिसरात लोकाश्रय आहे. इथल्या नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचं स्थान आहे. पण भररस्त्यात असं वर्तन केल्याने ते सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
शशिकांत खवरे गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. लक्ष्मीपूजनाला फटाके वाजत होते, त्याच वेळी हे कृत्य उत्साहाच्या भरात झाल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे. तसंच खवरेंकडे या शस्त्रांचा परवाना असल्याचंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ