कोल्हापुरात निवृत्त पोलिसाची पत्नीसह गोळी झाडून आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2018 04:40 PM (IST)
आत्महत्येपूर्वी बोबडे दाम्पत्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे
कोल्हापूर : कोल्हापुरात वृद्ध दाम्पत्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. निवृत्त पोलिस उपनिरीक्षक बबन बोबडे यांनी पत्नीसह आयुष्य संपवलं. बबन पांडुंरंग बोबडे हे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक असून पत्नी रेखा यांच्यासह ते राजलक्ष्मीनगर देवकर पाणंदमध्ये राहत होते. मंगळवारी दुपारी दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सोमवारी रात्री त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. आत्महत्येपूर्वी बोबडे दाम्पत्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. मात्र त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.