Kolhapur news: राहुल गांधींमध्ये मॅच्युरिटी आलीय, दिल्लीचा अनुभव चांगला आणि वेगळा आहे. असं म्हणत खासदार झाल्यानंतर दिल्लीत जाऊन कसं वाटतंय? असा प्रश्न काँग्रेस खासदार शाहू महाराज यांनी राहुल गांधींना विचारला. कोल्हापुरातून ते बोलत होते.
एक विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि तो आता आहे. राहुल गांधी यांच्यात मोठी मॅच्युरिटी आली आहे. म्हणूनच सर्वांनी त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली असल्याचेदेखील यावेळी ते म्हणाले. तसेच विशाळगड अतिक्रमणाविषयी एकत्र येऊन प्रश्न सुटतील असे म्हणत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत अशी भीती व्यक्त केली.
दोन आघाड्या आता आहेत, तिसरी झाली तर..
खासदार शाहू महाराज यांनी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आत्ता आहेत. पण तिसरी सुद्धा आघाडी झाली तर त्यांच्याकडून सुद्धा हे प्रश्न सुटतील. असे म्हणत माजी खासदार संभाजी राजे छत्रपती व आमदार बच्चू कडू यांना विशाळगडावरील आक्रमणाच्या मुद्द्यावर घेरले.
राज्यातील गडकोट प्रेमी व शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरला होता. अतिक्रमण हा प्रश्न केवळ एका घटकाला लागू नाही सर्वांना लागू आहे. अतिक्रमण असेल तर त्यावर प्रशासन कारवाई करेल, असे उत्तर खासदार शाहू महाराज यांनी माजी खासदार संभाजी राजे यांना दिले.
माझ्यापर्यंत कोणी आलं नाही, माझ्यापर्यंत आले तर नक्की पुढाकार घेईन- खासदार शाहू महाराज
विशाळगडावरील अतिक्रमण संदर्भात अद्याप माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाही. माझ्यापर्यंत आले तर मी नक्की पुढाकार घेईन. सर्वांनी एकत्र बसून हा विषय मिटवण्याची गोष्ट आहे. असे खासदार शाहू महाराज विशाळगडावरील अतिक्रमणविषयी म्हणाले.
कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक होत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगड या मोहिमेची हाक दिली आहे. 13 जुलै रोजी हजारो शिवभक्तांबरोबर विशाळगडावर जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये हा मुद्दा आहे. गडावर स्वच्छता राखली पाहिजे. न्यायप्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो असे खासदार शाहू महाराज म्हणाले.
वाघनख्यांबद्दल संशोधन होणे गरजेचे
शिवाजी महाराजांच्या वागणखांबद्दल संशोधन होणे गरजेचे आहे. इतिहास संशोधकांनी सातत्याने संशोधन करण्याची गरज आहे असे खासदार शाहू महाराज म्हणाले.
लंडनमच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून केलेल्या पत्रव्यवहारात लंडन मधील वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारने लंडनमधील ही वाघनखा परत आणण्याचा दावा केला होता. दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या माहितीत या वाघनखनबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा:
Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी