कोल्हापूर :   कर्नाटकात ओमायक्रॉनचा (Omicron)  शिरकाव झाल्यानंतर आता सरकार आणि यंत्रणा सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तासाला 1500 ऐवजी केवळ 1200 भाविकांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे.  दरम्यान कोरोना संसर्ग वाढल्यास केवळ 700 भाविकांनाच दर्शनासाठी पास दिले जातील, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. कोणत्याही भाविकांने मंदिरातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये, असं आवाहनही देवस्थान समितीककडून करण्यात आलं आहे.


 दरम्यान कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. घटस्थापनेपासून राज्यभरातली मंदिरं पुन्हा सुरु झाली. मात्र सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशबंदी होती. मात्र सरकारनं हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता प्रमुख देवस्थानांनी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.


ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात तपासण्या वाढवल्या


कर्नाटक , आंध्रप्रदेश , तामिळनाडू , तेलंगणा या राज्यातून मोठ्या संख्येने विठ्ठलभक्त देवाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. या भाविकांच्या मध्ये बंगळूरु , हैद्राबाद , चेन्नई अशा शहरातील भाविकांची संख्या लक्षणीय असल्याने मंदिर प्रशासनाने कोरोना तपासणीमध्ये अत्यंत काटेकोरपणा आणला आहे . आता प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत चार ते पाच ठिकाणी सॅनिटायझर मारण्यात येऊन त्याचे तापमान तपासण्यात येत आहे . प्रत्येक भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नसून हजारोंच्या संख्येने भाविक असूनही सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. सध्या दर दोन तासांनी मंदिराची सफाई केली जात असून मंदिर प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घ्यायला सुरुवात केल्याचे मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले . दरम्यान ओमायक्ॉनचा धोका वाढत असताना राज्यांच्या सीमेवर तपासणी कठोर केल्यास विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या दक्षिण भारतातील भाविकांमुळे धोका वाढणार नाही. 


Kolhapur : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शनाच्या निमयांमध्ये बदल



इतर महत्त्वाच्या बातम्या: