कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपले नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणात कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने एकहाती भगवा महापालिकेवर फडकला जाईल असा निर्धार केला आहे. मात्र, दोन गटांमध्ये विभागलेली शिवसेना हे ध्येय कसे गाठणार हा खरा प्रश्न आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान व्हावा या इराद्याने शिवसेना महापालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. अशावेळी शिवसेना निर्णायक जागेवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. मात्र, राजेश क्षीरसागर आणि संजय पवार असे दोन गट शिवसेनेमध्ये आहेत. त्याचा फटका शिवसेनेला बसणार हे नक्की आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही गटांमध्ये हे वाद आहेत. पक्षश्रेष्ठींना देखील हे वाद गेल्या दहा वर्षांमध्ये मिटवता आले नाहीत. त्यामुळे किमान आता तरी हे दोन्ही गट एकत्र येणार, की एकमेकांना गद्दार म्हणून समजणार हा खरा प्रश्न आहे. कोल्हापूर महानगर पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. आता हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे आपली ताकद दाखवायची असेल तर आधी पक्षातील भांडण शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना सोडवावे लागतील.
महाविकास आघाडी वेगळी लढणार कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तिन्ही पक्ष आता आगामी निवडणूक एकत्र लढणार नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकते. विशेष म्हणजे, काही प्रभागात छुपी युती करत भाजप आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याचीही शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय बलाबल
- काँग्रेस - 30
- राष्ट्रवादी - 14
- शिवसेना- 04
- ताराराणी आघाडी - 19
- भाजप - 14
- एकूण जागा – 81
संबंधित बातम्या : बिनविरोध करायची असेल तर गावाच्या एकीने व्हावी प्रलोभनाने नको, वाखरी ग्रामस्थांच्या जळजळीत प्रतिक्रिया मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार Maharashtra Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स