कोल्हापूर : उडान योजनेअंतर्गत यावर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा तीन दिवसांपासून बंद आहे. तांत्रिक अडचण असल्याचे सांगून ही विमानसेवा बंद करण्यात आहे. नाशिक-पुण्याबरोबर नाशिक-मुंबई, कोल्हापूर-मुंबई आणि जळगाव-मुंबई या विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.


येत्या 15 दिवसात विमानसेवा सुरु केली नाही तर एअर डेक्कन कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच विमानसेवा 15 दिवसात सुरु न केल्यास शिफारस करुन इंडिगो कंपनीला ही सेवा सुरु करण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती, महाडिक यांनी दिली आहे.


गेल्या 2 महिन्यापासून कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने सुरु केली होती. मात्र ही सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचा अपेक्षाभंग झाला असून नाराजी पसरलेली आहे.