कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा मोर्चाचं निवेदन स्वत: स्वीकारण्याची घोषणा केली. मात्र कोल्हापुरातील मराठा मोर्चा आयोजकांनी आमचं निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांनाच देऊ, असा निर्णय घेतला आहे.
"राज्यात सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापुरातही मोर्चा निघेल. निवेदन स्वीकारण्यासाठी कोण येत आहे हे आम्हाला माहित नाही. यापूर्वी सर्व जिल्ह्यातील निवदेनं हे त्या - त्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारलं. त्यामुळे कोल्हापुरातही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच देणार" असं मराठा मोर्चाच्या आजोयकांनी सांगितलं.
कोल्हापूरच्या मराठा मोर्चाचं निवेदन स्वत: चंद्रकांत पाटील स्वीकारणार!
हटके आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात येत्या 15 ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चाचं वादळ घोंघावणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेगळाच निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून, मराठा मोर्चाचं निवेदन स्वीकारणार आहेत.
यापूर्वीच्या मोर्चात सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निवदेनं स्वीकारली. मात्र त्याला छेद देत, स्वत: पालकमंत्री निवेदन स्वीकारणार असल्याची घोषणा चंद्रकांतदादांनी केली. मात्र आता आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देणार असल्याचं म्हटलं आहे.