यात्रेसाठी मुलीकडे आलेल्या महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2017 06:36 PM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. 55 वर्षीय जयश्री मराठे निपाणी यात्रेसाठी मुलीकडे रहायला आल्या होत्या. गुरुवारी मॉर्निंग वॉकला पन्हाळा मार्गावरुन चालत असताना एका दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की जयश्री या गाडीबरोबर तब्बल 200 फूट फरफटत गेल्या. गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयश्री यांना धडक देणाऱ्या दुचाकीवरुन एक महाविद्यालयीन प्रेमी युगुल जात होतं. या अपघातात ते दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.