कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मीचा प्रसाद कळंबा जेलमधील कैद्यांकडून करुन घेण्याचं काम सुरु झालं आहे. कैद्यांकडून अशाप्रकारे प्रसाद तयार करुन घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.

 
ज्या हॉलमध्ये लाडू तयार करण्याची यंत्रणा सुरु केली, त्या हॉलचं उद्घाटन पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आलं. कैद्यांनी बनवलेल्या या प्रसादाची आज विधीवत पूजा करुन तो भाविकांना वाटण्यात आला.

 
कारागृहातून दररोज 3 हजार प्रसादाचे लाडू तयार केले जाणार आहेत. कैद्यांकडून लाडू तयार करुन घेण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून कैद्यांकडूनच प्रसाद तयार करुन घेण्यास सुरुवात झाली आहे.