पाऊस लांबल्याने भाज्यांचे दर कडाडले
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 14 Jun 2016 09:16 AM (IST)
नाशिकः मोसमी पाऊस लांबल्यानं राज्यातील भाज्यांची आवक अचानकच मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडले असून टोमॅटोचा दर थेट 80 रुपये किलोंवर गेला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला जास्तीची कात्री लागत आहे. कारलं, दोडकं, फ्लॉवर, तोंडली 80 रुपये किलो, भेंडी 70 रु किलो, मिरची 70, मेथी 40 रुपये जुडी, कोथिंबीर 25 रुपये जुडी, लसूण 160 रुपये किलो अशी दरवाढ झाली आहे. भाज्या महागल्या असल्या तरी कांद्याचे भाव मात्र गडगडले आहेत. कांद्याला केवळ 10 रुपये प्रति किलो दराने भाव मिळत आहे. अचानक भाज्यांचे भाव कडाडल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलं आहे.