कोल्हापूर : कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन चिघळलं आहे. या महिलांनी खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच नदीत उड्या घेतल्या. मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ करण्याची या महिलांची मागणी आहे.

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने आंदोलनस्थळी पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी आक्रमक झालेल्या काही महिलांनी पंचगंगा नदीत उड्या मारल्या. जवळच उपस्थित असलेल्या जवानांनी नदीत उडी मारून महिलांना वाचवलं. महिलांनी नदीत उड्या मारल्याने काही काळासाही आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

कोल्हापुरात पूरग्रस्त आंदोलनकर्त्या महिलांनी थेट नदीत उड्या घेतल्या आहे. मायक्रोफायनान्सचं कर्ज माफ करण्याची मागणी या महिलांची आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कृष्णा, पंचगंगा या नद्यांना महापूर आला होता. या महापुरात अनेक संसार उद्ध्वस्त झाले. शेतीसहीत उद्योगधंद्यांचंही कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

kolhapur | पूरग्रस्त महिलांचे आंदोलन चिघळलं, खासदार मानेंसमोरच महिलांनी नदीत घेतल्या उड्या | ABP Majha



धैर्यशील माने म्हणाले, हजारो महिला त्या ठिकाणी जमल्या आहेत. मायक्रो फायनान्सचं या भागात आर्थिक जाळं आहे. पुरामुळे या महिलांना कर्ज फेडणं शक्य नाही. फार थोडे बचतटगट आहेत. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे त्याप्रमाणे आम्हाला दिली जावी अशी त्यांची मागणी आहे. मी यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोणतीही वसूली पूरग्रस्त भागात होऊ नये असे आदेश जिल्हाधिऱ्यांनी दिले आहेत. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून पुढील आठवड्यात भेटून चर्चा करणार आहे