Kolhapur District Bank Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Kolhapur District Bank Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर
आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केली उघड नाराजी
सत्तारूढ गटातील नेते प्रामाणिक राहिले असते तर विरोधी गटातील एकही जागा निवडणून आली नसती - कोरे
बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांचा विजय विनय कोरे यांच्या जिव्हारी
सर्वजण एकत्र यावे अशी अपेक्षा होती; मात्र माझ्या अपेक्षांना विश्वासघाताने सुरुंग लावला
ज्यांनी हे विश्वासघाताचे पाप केले त्यांना त्याची योग्य वेळी किंमत मोजावी लागले
विनय कोरे यांचा सत्ताधारी गटातील नेत्यांना इशारा
कोल्हापूर जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. मात्र ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी पॅनेलला घाम फोडला आहे. सध्या शिवसेना गटाचे तीन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार सेनेच्या बाजूचे झाले आहेत. तर सत्ताधारी गटाचे 11 उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीआधीच सहा जण बिनविरोध झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना किंगमेकर राहील असा दावा संजय मंडलिक यांनी केला आहे. या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. आमदार प्रकाश आवडे त्याच बरोबर काही विद्यमान संचालक देखील पराभूत झालेत. या निवडणुकीत अबिटकर बंधूंवर जोरदार टीका झाली. यांच्यामुळेच निवडणूक लागली अशी सत्ताधारी गटाने टीका केली होती. मात्र आपण उमेदवारीसाठी पात्र होतो हे अर्जुन अबिटकर यांनी दाखवून दिलं.
शेती संस्था व व्यक्ती सभासद गटातून सत्ताधारी गटाचे भैया माने विजयी
विरोधी आघाडीच्या क्रांतिसिंह पाटील यांचा केला पराभव
भैय्या माने यांना 2266 तर पाटील यांनी 1655 मत
611 मताधिक्याने विजय
आतापर्यंतच्या निकालात सत्ताधारी गटातील 5 उमेदवार विजयी
तर विरोधी गटातील 4 उमेदवारी विजयी
विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक, अर्जुन अबिटकर, बाबासाहेब पाटील आसुरलेकर आणि रणवीर गायकवाड विजयी
सत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील विजयी
पतसंस्था गटातून अर्जुन अबिटकर विजयी, सत्ताधारी गटाला धक्का, आमदार प्रकाश आवडे यांना केलं पराभूत
जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा सत्ताधारी गटाचे वर्चस्व
आतापर्यंतच्या निकालात सत्ताधारी गटातील 5 उमेदवार विजयी
तर विरोधी गटातील 2 उमेदवारी विजयी
विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक आणि रणवीर गायकवाड विजयी
सत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील विजयी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, पहिला निकाल हाती
सत्ताधारी गटानं खातं उघडलं
आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी
विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा केला
जिल्हा बँक निवडणुकीच्या मतपेटीतून निघाल्या नेत्यांना लिहिलेल्या चिठ्ठ्या
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदारांचा प्रताप, मतपत्रिकेतून टाकल्या चिठ्ठ्या
सर्व उमेदवार राजकारणी असून निवडणूक झाल्यानंतर एकत्र येणार असल्याचा टोला
नेत्यांच्याजवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल ही मतपेटीत तक्रारी
एका मतपेटीतून निघाले चक्क पन्नास रुपये
पार्श्वभूमी
Kolhapur District Bank Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. ही जिल्हा बँक विरोधकांच्या हातात जाते की पुन्हा सत्ताधारी आपलं वर्चस्व कायम राखतात हे आज स्पष्ट होणार आहे...सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ करत आहेत तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश अबिटकर करत आहेत...21 पैकी 6 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत... त्यामुळे 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत... बुधवारी जिल्हा बँकेसाठी तब्बल 98 टक्के मतदान झाले आहे... जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता मात्र शिवसेनेला देऊ केलेल्या दोन जागा त्यांना मान्य नव्हत्या. त्यामुळे शिवसेनेनं इतर छोट्या छोट्या घटकांना सोबत घेऊन पॅनल बनवले..तर सत्ताधारी पॅनलकडून राक्षसी वृत्तीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक लागल्याचा आरोप करण्यात आला...आता महाविकास आघाडीतील तीन पक्ष या निवडणुकीत फुटले आहेत...त्यामुळे निकाल काय लागतो याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -