कोल्हापूर जवळच असलेल्या शिये गावातील नवजीवन दूध संस्थेत दूध घालणाऱ्या एका शेतकऱ्याच्या म्हशीचा रेबीजने मृत्यू झाला. यानंतर डेअरीतून दूध घेणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर नागरिकांचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. संबधित डेअरीने सुद्धा नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Special Report | म्हशीला कुत्रा चावल्यानं संपूर्ण गाव दवाखान्यात! | ABP Majha
म्हशीच्या वैद्यकीय अहवालानंतर डेअरीतून त्या म्हशीचे दूध खरेदी केलेल्या ग्राहकांबरोबरच रोज दूध विकत घेणाऱ्या असलेल्या ग्राहकांची चांगली तारांबळ उडाली आहे. म्हशीच्या दुधामुळे आपल्याला धोका तर नाही ना अशी शंका नागरिकांच्या मनात आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य विभाग ही खडबडून जागा झाला आहे. गैरसमजातून ग्रामस्थांमधील भीती अजूनच वाढत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. दूध संस्थेने ही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दूध खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना याची कल्पना संस्थेकडून दिली जाते. शिवाय गोकुळ दुध मार्फत ही आता सर्वच म्हशींची वैद्यकीय तपासणी संस्था करणार आहे.