कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये 10 वाहनांना धडक देऊन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी बस, ही पुण्यातल्या संतोष माने प्रकरणातलीच बस असल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पुण्याच्या घटनेचीच पुनरावृत्ती असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात रंगली आहे.




25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातल्या रस्त्यांवर बेदरकारपणे गाडी चालवून संतोष मानेनं 9 जणांचा बळी घेतला होता. त्या अपघातात वापरलेली बस ही एमएच-14 बीटी- 1532 नंबरची होती. तर कोल्हापुरातही काल झालेल्या अपघातामध्ये याच बसने 10 वाहनांना धडक दिली.

उमा टॉकीज चौकातून काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एमएच-14 बीटी- 1532 नंबर एसटी बस जात होती. या बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 10 ते 15 वाहनांना धडक दिली. यात 5 वाहनांचं नुकसान झालं आहे. एकीकडे गाडीचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचा ताबा सुटल्याचं बोललं जात आहे.

पुण्यातील संतोष माने प्रकरणातील बस

दरम्यान, आम्ही दोन्ही घटनेतल्या बसचे फोटो पाहिले, त्यातही दोन्ही बसचे क्रमांक सारखे असल्याचं समोर आलं आहे. पण संतोष मानेने वापरलेली बस आणि कोल्हापुरात झालेल्या अपघातातली बस एकच आहे? की फक्त एका बसचा नंबर दुसऱ्या बसला देण्यात आला आहे, याची पडताळणी आम्ही करत आहोत.

संबंधित बातम्या

कोल्हापूरमध्ये एसटी बसची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू