Kolhapur Accident News : कोल्हापुरात (Kolhapur) बस आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झला आहे. उचगावच्या कमानी नजीक ही मोठी दुर्घटना घडली आहे. रमेश राठोड असं या घटनेत मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचं नाव आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसात उशिरापर्यंत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

Continues below advertisement

दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक

कोल्हापुरात आराम बस आणि दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली आहे. उचगावच्या कमानी नजीक ही मोठी दुर्घटना घडली आहे. दुचाकीस्वार रमेश राठोड यांचं या घटनेत मृत्यू झाला आहे. रमेश राठोड हे कोल्हापूर शहरात निघालेले असताना, यावेळी लक्झरी बस उचगाव महामार्गकडे येत होती. उचगाव कमानी जवळच्या चौकात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. रमेश राठोड यांचा यामझ्ये मृत्यू झाला आहे. 

येवला-मनमाड रोडवर भीषण अपघात, टॅंकरची रिक्षाला धडक;  5 ते 6 जण गंभीर जखमी

येवल्याकडून मनमाडकडे जात असताना येवला - मनमाड रोडवरील विसापूर फाट्याजवळ टॅंकरने रिक्षाला धडक मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रिक्षातील 5 ते 6 प्रवासी जखमी झाले आहेत. ही प्रवासी रिक्षा मनमाड येथे जात असताना हा अपघात घडला असून या रुग्णांवर येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातातील टँकर घेऊन टँकर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Accident News: कारचा स्पीड 140, नियंत्रण सुटलं अन् ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली, वाहनाचा चेंदामेंदा; दोन जिवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी अंत