नाशकात अॅथेलेटिक्स कोचवर चाकू हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 10:31 AM (IST)
नाशिक: नाशिकमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्यामुळं अॅथेलेटिक्स प्रशिक्षकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या चाकू हल्ल्यात प्रशिक्षक वैजनाथ काळे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील गोदापार्क जवळ हा हल्ला करण्यात आला. काळे सकाळी मुलींना ट्रेनिंग देत असताना अज्ञात टोळक्यानं मुलींची छेड काढली. याबद्दल त्यांना जाब विचारला असता, त्या टोळक्याने काळे यांच्यावर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात प्रशिक्षक काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी 2 संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.