मुंबई : तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठं यश आलं. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. तसंच सरकारने मान्य केलेल्या मागण्या या लेखी स्वरुपातही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने कोण-कोणत्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या आणि सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या यावर एक नजर  :
सरकारकडून चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे आणि गिरीष महाजन हे तीन मंत्री आझाद  मैदानावर  आले. सरकारकडून चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार जे पी गावित यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या लेखी आश्वासनाचं वाचन केलं. संबंधित बातम्या :शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश, लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागेशेतकऱ्यांच्या 80 टक्के मागण्या मान्य, शिष्टमंडळाला लेखी आश्वासनमहाजन म्हणतात 80%, पाटील म्हणतात 100% शेतकरी मागण्या मान्य!भाजप सरकार असंवेदनशील, शरद पवारांची टीकारायगडवरुन शेतकऱ्यांसाठी दीड लाख भाकऱ्यांची शिदोरीमोबाईल चार्जिंगसाठी मोर्चातील शेतकऱ्याची अनोखी शक्कलकिसान मोर्चातून माओवाद डोकावतोय का? पूनम महाजनांची मुक्ताफळं