सात कंपन्यांपैकी 2 कंपन्यांवर सेबीने बंदी घातली असून 2 कंपन्यांमध्ये छगन भुजबऴांनी पैसे गुंतवले असल्याची माहिती सोमय्यांनी दिली. शिवाय पंतप्रधान मोदींनी बोगस कंपन्यांविरोधात टास्क फार्स नेमला म्हणून उद्धव ठाकरे मोदींवर टीका करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं नाही तर सर्व कागदपत्र माध्यमांना देणार असल्याचा इशाराही सोमय्यांनी दिलाय. त्यामुऴे आता उद्धव ठाकरे आपल्या सभेत सोमय्यांच्या आरोपांना काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.
दरम्यान किरीट सोमय्यांनी त्यांची संपत्ती वेबसाईटवर जाहीर केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी, असं आव्हान सोमय्यांनी दिलं आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/831109780055977987
किरीट सोमय्यांनी दावा केलेल्या सात कंपन्या :
जगमंद्री फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड
किम इलेक्ट्रॉनिक्स
जेपीके ट्रेडिंग
लेक्सस इंफोटेक
रिगलगोल्ड ट्रेंडिंग को-ऑपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड
व्हॅनगार्ड ज्वेल्स लि.
यश ज्वेल्स लि.
पाहा व्हिडिओ :