श्रीनगर/औरंगाबाद : महाराष्ट्राचा आणखी एक वीर देशासाठी कामी आला आहे. औरंगाबादचा जवान किरण पोपटराव थोरात यांना पाकिस्तानसोबतच्या चकमकीत वीरमरण आलं.


काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 31 वर्षीय किरण थोरात शहीद झाले.

किरण थोरात हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडीचे रहिवासी आहेत.

काल कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांना वीरमरण आलं.

किरण यांचं वय 31 वर्षे होतं. किरण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी आहे. काल दुपारी कृष्ण घाटी आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये किरण जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

किरण अकरा वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. अत्यंत धाडसी, कर्तव्यदक्ष जवान म्हणून किरण यांची ओळख होती. किरणच्या वीरमरणामुळे वैजापूर तालुक्यासह मराठवाड्यावर  शोककळा पसरली आहे.