वारीत अन्नदान करणाऱ्या महिलेचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2018 11:25 AM (IST)
कविता तोष्णीवाल या महाबळेश्वर येथील एका कापड व्यवसायिकाची पत्नी आहेत. काल ज्ञानोबांची पालखी लोणंदवरुन फलटणला जात होती. कविता तोष्णीवाल रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाला. त्या ट्रकखाली चिरडल्या गेल्या.
सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकरी महिलेचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला असून, ही महिला दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी पती आणि मुलांसोबत गेल्या होत्या. कविता तोष्णीवाल असे या महिलेचे नाव आहे. कविता तोष्णीवाल या महाबळेश्वर येथील एका कापड व्यवसायिकाची पत्नी आहेत. काल ज्ञानोबांची पालखी लोणंदवरुन फलटणला जात होती. कविता तोष्णीवाल रस्ता ओलांडताना त्यांचा अपघात झाला. त्या ट्रकखाली चिरडल्या गेल्या. अपघातावेळी दोन लहान मुलेही त्यांच्यासोबत होती. सुदैवाने ती बचावली. हा अपघात लहान मुलांसमोरच झाला. या मुलांचा आक्रोश पाहिल्यावर वारकरी खुपच संतप्त झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली असून ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.