Mahebub Shaikh on Akshay Shinde : बदलापूर येथील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. आरोपी अक्षयने पोलिस पथकावर गोळीबार केला, ज्यात पोलिस अधिकारीही जखमी झाले. पोलिसांचे पथक तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे याला पोलिस व्हॅनमध्ये ट्रान्झिट रिमांडसाठी नेले जात असताना, त्याने पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार सुरू केला. या घटनेत पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनाही गोळी लागली, त्यानंतर त्यांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केला. अक्षय शिंदेनं पोलिसांवर तीन राऊंड गोळीबार केला, त्यात एपीआय नीलेश मोरे हे जखमी झाले. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर पोलिसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 


कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का?


मेहबूब शेख यांनी म्हटले आहे की, बदलापूर घटना ही खूप गंभीर आहे, त्या आरोपीला जगण्याचा अधिकारच नाही. अधिक चांगलं झालं असतं जर त्याला फाशी दिली असती. या सगळ्या गोष्टीत पोलिसांवर संशय निर्माण होत आहे. बलात्कारातील आरोपीच्या हातात बेड्या नव्हत्या का बाहेर आणताना? अशी विचारणा त्यांनी केली. तो काय टुरिझमला आलेला आहे का? मुळात याच्यात वाटतं आरोपी अजून कुठे जाऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता का? कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही, कसाबला फाशी दिली गेली. कसाबपेक्षा हा सराईत गुन्हेगार होता का? कसाबला कधी रिवाल्वर काढता आली नाही. कसाबपेक्षा याने चांगली ट्रेनिंग घेतली होती का? बिना हातकडीचा मुख्यत आरोपीला जेलच्या बाहेर काढणाऱ्या पोलिसांना अगोदर डीसमिस केलं पाहिजे. 


याला सजासजी मारून देण्यापेक्षा चौकात फाशी द्यायला पाहिजे होती. त्याला मरण आले हे चांगलेच आहे, त्याला फाशीने मरण आलं असतं तर कायद्याचं कायद्याच्या चौकटीत बसून मरण योग्य झालं असतं. काहीतरी दडपण्यासाठी हे केल्याचा वाटतं. तुम्ही त्याचे हात मोकळे सोडले तुमची रिवाल्वर येऊन काढतो कसा? अशी विचारणा त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या