- विवाहासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक.
- विवाह समारंभाला केवळ पन्नास व्यक्तींना उपस्थित राहण्यास अनुमती.
- गर्भवती महिला, 65 वर्षावरील व्यक्ती आणि दहा वर्षाखालील मुलांना विवाहाला उपस्थित राहता येणार नाही.
- कंटेन्मेंट झोनमध्ये विवाहाला परवानगी नाही.
- विवाह स्थळ सार्वजनिक ठिकाणी आणि नैसर्गिक वातावरण असणे आवश्यक.
- विवाह समारंभात एसीच्या वापराला परवानगी नाही.
- विवाहाच्या ठिकाणी एक नोडल अधिकारी उपस्थित राहणार.
- विवाहाला आलेल्या निमंत्रितांची यादी नोडल अधिकाऱ्याला देणे बंधनकारक.
- विवाहाला उपस्थित राहणाऱ्यानी आरोग्य सेतू हे अँप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे.
- विवाहस्थळी प्रवेशद्वारात सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.
- विवाहाला येणाऱ्यांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.
- विवाहाला येणाऱ्यांचे थर्मल स्क्रीनिग करणे आवश्यक आहे.
- 99.5 सेल्सियस तापमान असल्यास ताप असल्यास, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करायला पाहिजे.
- दोन व्यक्तींमध्ये एक मीटर सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
- विवाहस्थळी साबण आणि हॅन्ड वाश यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे.
- विवाहस्थळी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
- मद्यपान,गुटखा,तंबाखू सेवन करण्यास मनाई आहे.
विवाह सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारची नियमावली!
विलास अध्यापक, एबीपी माझा | 15 May 2020 08:38 PM (IST)
लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांना आता कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमांचे पालन करावे लागणार आहे.
Bride and groom are holding their hands of each other, showing their love before starting a new married life. In Pakistan and India bride wear lots of jewelry in her hands and arms.
बेळगाव : कोरोना विषाणूची महामारी सुरू झाल्यामुळे ठरवलेले अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले आहेत. आता 18 मे पासून सध्या असलेल्या नियमात शिथिलता आणून जनतेला आणखी सूट दिली जाणार आहे. कर्नाटक सरकारने विवाहासाठी सतरा नियम घातले आहेत. या नियमांचे पालन करूनच पुढील काळात विवाह समारंभाचे आयोजन करता येणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. परिणामी संपूर्ण देश ठप्प आहेत. अनेक आर्थिक व्यवहारही बंद पडले आहेत. सध्या देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. 18 मे पासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मार्च आणि मे महिन्यात विवाहाच्या मुहूर्त असतात. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक विवाह पुढे ढकलण्यात आले आहे. अशांना आता कर्नाटक सरकारने मोठा दिलासा दिला आहे. विवाहासाठी कर्नाटक सरकारने केलेली नियमावली पुढीलप्रमाणे