काळा दिन LIVE UPDATE | महाराष्ट्रातील बसेसवर बेळगावमध्ये हल्ल्या करण्याचा प्रयत्न
Karnataka day :1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे.
बेळगाव, कारवार, निपाणीसह 'संयुक्त महाराष्ट्र' हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठाभाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास देतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी एक प्रतिनिधी या सभेला येत असतात,
एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे देखील उपस्थित
पार्श्वभूमी
बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकारची मराठी भाषिक बांधवांवर दमदाटी सुरुच आहे. मराठी भाषिकांनी उद्या अंगावर एकही काळा कपडा घालू नये, असं फर्मान कर्नाटक सरकारनं काढलं आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची दमदाटी
काळा दिन धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दमदाटी करून आंदोलन स्थळी जावा.येथे थांबू नका असे कार्यालयाकडे जमलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी सांगितले.सायकल फेरी रद्द झाल्यामुळे मराठा मंदिर येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसैनिक जमले होते.त्यावेळी पोलिसांनी तेथे दाखल होऊन आक्षेप घेतला.तुम्ही आंदोलनस्थळी जा, येथे कशाला जमला आहात असे विचारून दमदाटी केली.
सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच - लक्ष्मण सवदी
बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे केलं आहे.महाराष्ट्रात कोण काही म्हणतंय म्हणून काय होत नाही. मुंबईत बसून बोलू नये त्यांनी बेळगावात आमच्या भूमीत येऊन बोलावं. त्याला आम्ही चोख उत्तर देऊ असं आव्हानही सवदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
सवदी यांच्या वक्तव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख उत्तर दिलं आहे. चंद्र-सूर्य नाही तर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावरून खाली होण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात घेऊ असं प्रति आव्हान हसन मुश्रीफ यांनी सवदी यांना दिलं.
कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने सायकल फेरी होणार नाही. केवळ निवडक कार्यकर्ते मराठा मंदिराच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत. कोणतीही फेरी, मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. 1956 साली राज्य पुनर्रचना झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत असून त्या दिवशी मराठी भाषिक फेरी काढतात. यावर्षी देखील फेरीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी फेरीसाठी परवानगी देण्याची मागणी करून निवेदन दिले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -